Department of Marathi
DEPARTMENTAL Action Plan
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नेमून दिलेला अभ्यासक्रम निर्धारित वेळेत पूर्ण करणे.
- मराठी विभागाअंतर्गत प्रत्येक सत्रात एक अशा किमान दोन चाचण्या घेणे व विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची माहिती देणे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिलेल्या विषयावर विद्यार्थ्यांकडून प्रकल्प नियोजित वेळेत करून घेणे.
- लेखन नियमानुसार लेखन सूत्रसंचालन सर्जनशील लेखन यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करणे
- मराठी भाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन व हा कार्यक्रम उत्साहात साजरा करणे.
- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी काव्यलेखन कथालेखन निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी स्पर्धांचे किंबहुना अशा विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्तानी अतिथी व्याख्यानांचे आयोजन करणे.
- महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मराठीतील वैचारिक साहित्यावर चर्चासत्रांचे आयोजन करणे.
- वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, नाटक, एकांकिका स्पर्धा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन विद्यार्थी नियमानुसार बहिस्थ महाविद्यालयात पाठविणे.